राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते नाही तर पक्षविरोधी नेते – बाळासाहेब थोरात

राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते नाही तर पक्षविरोधी नेते – बाळासाहेब थोरात

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही तर पक्षविरोधी नेते असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली तेच चुकीचे वागताहेत. शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपिठावर पाहीजे होते. त्यांनी काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान केलं असल्याचीही बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केली आहे. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथे विजय निर्धार सभेत ते बोलत होते.

दरम्यान सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सर्वांनी एकत्र आले पाहिजे असं आवाहनही यावेळी थोरात यांनी केलं आहे.

COMMENTS