जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होईल – बाळासाहेब थोरात

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होईल – बाळासाहेब थोरात

मुंबई – राज्यातील आगामी पाच जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडीचाच विजय होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. नागपूर, वाशीम, नंदुरबार, धुळे व अकोला जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज टिळक भवन येथे प्रांताध्यक्ष थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार. के. सी. पडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, नतिकोद्दीन खतीब, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील, भाई नगराळे, प्रकाश सोनावणे, प्रफुल्ल गुडदे पाटील, रामकिशन ओझा यांच्यासह जिल्हा निरीक्षक, जिल्हा प्रभारी व संबंधित जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते.

या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मित्र पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी क्षमता असेल तेथे शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविली जाईल असेही थोरात म्हणाले.

COMMENTS