शरद पवारांच्या घरासमोर अजितदादांचं आंदोलन ! पाहा व्हिडीओ

शरद पवारांच्या घरासमोर अजितदादांचं आंदोलन ! पाहा व्हिडीओ

बारातमती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील `गोविंदबाग`या बंगल्यासमोर मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आज ठिय्या धरला आहे. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अजित पवारांनीही एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत आंदोलकांना जोरदार पाठिंबा दिला आहे.

दरम्यान बारामतीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातीलकार्यकर्त्यांनी दिला होता.त्यानुसार शरद पवार यांच्याही घरासमोर आंदोलन करण्याचे आंदोलकांनी जाहीर केले होते. आज सकाळी आठ वाजता आंदोलक गोविंदबागेसमोर जमले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास अजित पवार हे देखील तेथे पोहचले. यावेळी त्यांनी रस्त्यावर खाली बसत आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनंतर अजित पवार यांनी हातात माईक घेतला. मराठा आंदोलकांच्या घोषणाही त्यांनी दिल्या. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी नारेबाजी त्यांनी केली. आंदोलकांनी दिलेले निवेदन त्यांनी स्वीकारले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले.

 

 

 

 

COMMENTS

Bitnami