बारामतीतल्या अदृश्य ग्रामपंचायतीने कोट्यवधी खाल्ले !

बारामतीतल्या अदृश्य ग्रामपंचायतीने कोट्यवधी खाल्ले !

पुणे – बारामतीमध्ये सध्या एका ग्रामपंचायतीची जोरदार चर्चा सुरु आहे. ही अशी ग्रामपंचायत आहे जिचं नाव ऐकलं की सगळ्यांच्याच चेह-यावर प्रश्नचिन्ह दिसत आहे. कारण या ग्रामपंचायतीचं नाव आणि ठिकाण कोणालाच माहीत नाही. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीने कोट्यवधी रुपये हडप केले आहेत. आरटीआय कार्यकर्त्यांनी या नकली ग्रामपंचायतीविरोधात तक्रार दाखल केली असून काही अधिका-यांवर गुन्हाही दाखल केला आहे. ग्रामीण नावाने या ग्रामपंचायतीची कागदोपत्रं आहेत. या ग्रामपंचायत कार्यालयाचा कुठे बोर्ड ही नाही की कार्यालय ही नाही. मात्र पिशवीत तीन वह्या, चार शिक्के, लेटरहेड बेकायदा नेमणूक करण्यात आलेला ग्रामसेवक अशी एक ग्रामपंचायत गेली २८ वर्षांपासून कार्यरत होती.

या ग्रामपंचायतीने ना हरकरत प्रमाणपत्रांची खैरात केली आहे. घरकुलांचे दहा मिनिटांत वाटप केलं असून या ग्रामपंचायतीकेड अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत. १९८५ ते २०१२ सालापर्यंत या बनावट ग्रामपंचायतीमध्ये खरेखुरे शासकीय कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी खराखुरा कोट्यवधी रुपयांचा घोटाळाही केला. मात्र गेल्या पाच वर्षापासून याप्रकरणात फक्त चौकशीचा फार्स सुरू आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर या प्रकरणात पंधरा गटविकास अधिकारी आठ विस्तार अधिकारी आणि पाच ग्रामसेवक यांना दोषी धरण्यात आलं आहे. मात्र साक्ष आणि चौकशी यात हे प्रकरण लटकून राहिलं असून याप्रकरणी आता कारवाई केली नाही, तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आरटीआय कार्यकर्त्ते पोपट धवडे, वसंतराव घुले, बापूराव सोलणकर आणि विजय थिटे यांनी दिला आहे.

COMMENTS