हे माझ्याविरोधात षडयंत्र – सुप्रिया सुळे

हे माझ्याविरोधात षडयंत्र – सुप्रिया सुळे

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले राहुल शेवाळे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र हे माझ्याविरोधात षडयंत्र असून मी राहुल शेवाळेंच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे यांनी धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. माझ्या नादाला लागू नका. मी काही कंत्राटदार नाही. घरात घुसून ठोकून काढेल. अशी भाषा राहुल शेवाळे यांना वापरल्याची ही ऑडिओ क्लिप आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सुळेंविरोधात काही विधाने केल्याच्या बातम्या देखील प्रसारीत झाल्या. त्या बातम्यांची दखल घेत, खासदार सुप्रिया सुळे यांनी राहुल शेवाळे यांना फोन करून जाब विचारल्याचा दावा करणारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

परंतु आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेलेत ते काही एकटेच नाहीत, असे सुळे यांनी म्हटले आहे. एक महिला आहे म्हणून अशा पद्धतीने घाण राजकरण केले जात आहे. मी जर धमकी दिली असेल तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती पोलीस स्टेशनला का गेले नाहीत? असा सवालही सुळे यांनी केला आहे.

COMMENTS