पार्थला निवडणूकीत आणून अजित पवार फसले,  …तेव्हाच पार्थ पवार हरले – चंद्रकांत पाटील

पार्थला निवडणूकीत आणून अजित पवार फसले, …तेव्हाच पार्थ पवार हरले – चंद्रकांत पाटील

बारामती – बारामतीत आज युतीची जाहीर सभा पार पडली. या.सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह युतीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्षे सुपा भाग दुष्काळी केला त्या भागात मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच पाऊस झाला. शरद पवार तुम्ही राज्यसभेत आहात म्हणून वाचलात तुमच्या घरातील लोकसभेला कुळही निवडून येणार नाहीत या जन्मी केले ते याच जन्मी फेडायचय अशी जोरदार टीका पाटील यांनी केली.

दरम्यान पार्थ पवारला निवडणुकीत आणून अजित पवार फसले आहेत. लक्ष्मण जगताप यांनी श्रीरंग बारणे यांना मिठी मारली तेव्हाच पार्थ पवार हरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या पवार कुटूंबात कुणीही घरात दिसत नाहींत. प्रचारासाठी फिरतायेत.
बारामतीत मतदारांनी पराक्रम करावा असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

COMMENTS