बीडमध्ये राष्ट्रवादीची चलती, सहा पैकी फक्त दोन जागांवर भाजपचा विजय!

बीडमध्ये राष्ट्रवादीची चलती, सहा पैकी फक्त दोन जागांवर भाजपचा विजय!

बीड – राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. ही मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून जवळपास निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. बीडमधीलही विधानसभेच्या सहाही जागांचं चित्र स्पष्ट झालं असल्याचं दिसत आहे. बीडमधील सहा पैकी चार जागांवर राष्ट्रवादी विजयाच्या उंबरठ्यावर आहे.बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर हे 2759 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना मोठा धक्का बसला आहे. तर आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे 15114 मतांनी आघाडीवर आहेत. तसेच माजलगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके 13348 मतांनी आघाडीवर आहेत. तर परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे 28116 मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चत झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला बीडमध्ये मोठं यश मिळालं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान बीडमध्ये भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा यांनी विजय मिळवत भाजपचं बीडमधील खातं उघडलं आहे. केज विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच चर्चेत होती. राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढली. त्यामुळे या निवडणुकीत मुंदडा यांचा विजय होणार का याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु त्यांनी केजमधून विजय मिळवला आहे.

COMMENTS