समता पर्वाची दुसरी इनिंग मी बीडमधून सुरू करतोय, शेरोशायरी आणि कवितांमधून भुजबळांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे !

समता पर्वाची दुसरी इनिंग मी बीडमधून सुरू करतोय, शेरोशायरी आणि कवितांमधून भुजबळांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे !

बीड – तब्बल तीन वर्षानंतर झालेल्या महात्मा फुले समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकावर चौफेर हल्ला चढवला. भाषणाच्या सुरूवातीलच त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. समतेच्या कामात खांद्याला खांदा लावून लढणारे गोपीनाथ मुंडे आमच्यात नाहीत असं सांगत मुंडेंनी बहुजनांसाठी कधीही पक्ष काय म्हणेल याचा विचार केला नाही. पंकजा मुंडेही आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला भेटायला आल्या असं सांगितलं.

आपल्याला अटक का झाली याची कारणे सांगत त्यांनी भाजप सरकावर हल्लाबोल केला. ज्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीच्या कामात भ्रष्टाचार झाला असा आरोप आपल्यावर केला जातो. त्या इमारतीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी बैठका घेतात. पाच फुटाची म्हैस आणि पंधरा फुटाचे रेडकू अशा प्रकार आपल्याला जाणीपूर्वक टार्गेट केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. माझ्या प्रॉपर्टी जप्त केल्या जात आहे. सगळ्या प्रॉपर्टी जप्त केल्या तरी लोकांचं प्रेम कसं जप्त करणार असा सवालही भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी सुरेश भटांची कविता सांगत आपण संपलेलो नाही असं सांगितलं.

डांबले तुरुंगात मज, हा माझा अंत नाही,

उठेन आता नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही.

ओबीसींबाबत सरकार सापत्न भावाची वागणूक देत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. मात्र ओबीसी चळवळ थंडावली नाही असा इशारा सरकारला दिला. ओबीसी शिष्यवृत्ती बंद पडलल्या आहेत. आयआयटीचे आरक्षण बंद झाले आहे. ओबीसींना सरकारी नोकरीत योग्य वाटा दिला जात नाही असा आरोप केला. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसीमधून नाही असंही ते म्हणाले. मराठा, मुस्लिम, जाट, पाटीदार यांनाही आरक्षण द्या असंही ते म्हणाले. शेरोशायरीतून मोदींवह हल्लाबोल केला. मोदींना आणि भाजपला घमंड आहे असाही आरोप भुजबळांनी केला.

तुफान ज्यादा हो तो कशतीया भी डूब जाती है,

घमंड जादा हो तो हस्तिया भी डूब जाती है !

ओबीसी, मराठा, मुस्लिम यांना आपसात लढवण्याचा सरकाराचा डाव आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. निवडणुका जशजशा जवळ येतील तसंतसं एकमेकांत भांडणं लावली जातील असं सांगत जनतेनं सावध राहावं असंही ते म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी शिवसेनेचं अभिनंद केलं. त्याचवेळी ओबीसींच्या आरक्षणाला शिवसेनेनं विरोध केला होता याची आठवण करुन दिली. जातीला आरक्षण नको ही भूमिका शिवसेनेनं बदलली त्याबद्दल त्यांनी शिवसेनेचं अभिनंद केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. महात्मा फुलेंनी ती गाडली. तीच मनुस्मृती आज डोके वर काढत आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावरही जोरदार टीका केली. संविधान बदलण्याची भाषा आणि घटना बदलण्याची भाषा भाजपचे नेते बोलत आहेत. दुष्काळ पडलाय तरी सरकार शेतक-यांकडून सक्तीने वीजबील भरण्याची भाषा करत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शेतक-यांना कर्जमाफी मिळाली नाही असा आरोपही त्यांनी केला. मेक इन इंडियाच्या नावाखाली घरात बॉम्ब बनवले जात आहे असंही ते म्हणाले. नोटबंदीमुळे ओबीसी भरडले गेले. धंदे बुडाले, दहशताव थांबला नाही असंही ते म्हणाले. ओबीसींनी एकत्र राह असं सांगत धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांना अप्रत्यक्ष सांगितलं.

COMMENTS