बीड जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर अडकलेल्या सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन !

बीड जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर अडकलेल्या सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन !

बीड – जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर अडकलेल्या सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केलं आहे.
शासनामार्फत सध्या स्वत:च्या जिल्ह्यात परत येण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत त्यांच्याद्वारे केवळ अडकून पडलेल्या व्यक्तींना परवानगी देणे अपेक्षीत आहे. उदाहरणार्थ प्रवासी, यात्रेकरु, पर्यटक विद्यार्थी तात्पुरते कामगार इ. सबब जे लोक बऱ्याच कालावधीपासून जिल्हयाबाहेरच राहत आहेत त्यांच्यासाठी स्वत:च्या जिल्हयात अतितातडीचे कारण नसल्यास परत येण्याची परवानगी देणे अयोग्य हाईल. सबब अशा व्यक्तींनी बीड जिल्ह्यात परत येण्यासाठी किंवा बीड जिल्ह्यातून बाहेर जाणेसाठी अर्ज करु नयेत असं रेखावर यांनी म्हटलं आहे.

तसेचcovid१९.mhpolice.in या संकेतस्थळावर केवळ बीड जिल्हयांतर्गत योग्य कारणास्तव प्रवास करावयाचा असेल तर आपण अर्ज करावा.

जर आपल्याला योग्य कारणास्तव जिल्हयाची हद्द ओलांडून बीड जिल्हयात यायचे किंवा जिल्हयाबाहेर जायचे असेल तर आपण https://beed.gov.in या संकेतस्थळावरील ई-पास सुविधेचा वापर करावा.

परंतु जर अतितात्काळ वैद्यकीय किंवा अतितात्काळ असणाऱ्या अत्यावश्यक प्रयोजनांसाठी आपल्याला जिल्हयाअंतर्गत किंवा जिल्हयाबाहेर जाणेची परवानगी हवी असेल तर आपण खालील अधिकायांच्या क्रमाकावर संपर्क साधावा.
१ श्री संतोष धर्माधिकारी ना.तह बीड, मोबाईल नं ९३७१५४७२७१
२.श्री.श्रीकांत रत्नपारखी ना.तह.बीड मोबाईल नं. ९४२२७४५५३२

जर आपले दुकान केवळ विषम दिनांकास स.७ ते स ९.३० या काळातच उघडे ठेवण्याची परवानगी दिलेली असेल तर दुकान चालक व त्याचे कार्मचारी यांना कोणाताही पास घेण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांना या काळाव्यतीरीक्त बाहेर राहण्यास परवानगी नाही.

ज्या कामकाजांना विषम दिनांकास स.६.०० ते स १०.०० या वेळेव्यतीरीक्त काम करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. त्या सर्वांना आपापल्या कर्मचा-यांसाठी याआधीच घोषित केलेल्या पध्दतीप्रमाणे शिफारस पत्र संबंधीत अधिकाऱ्याकडून घेऊन covid१९.mhpolice.in या सकेतस्थळावर ऑनलाईन पाससाठी अर्ज करावा.

ज्या ज्या व्यक्तीकडे पास आहे त्या व्यक्तींच्या स्वत:च्याच दुवाकीना पेट्रोल देता येईल तसेच संबंधित शासकीय विभागाकडून प्रमाणीत केलेल्या वाहनांना डिझेल देता येईल. इंधन देण्याविषयीचे याआधीचे नियमांचेही पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

COMMENTS