बीड जिल्ह्यात आजपासून लागू होणार हे बदल !

बीड जिल्ह्यात आजपासून लागू होणार हे बदल !

बीड – जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी आदेशित केल्यानुसार बीड जिल्ह्यात आजपासून खालील बदल लागू करण्यात आले आहेत.

• शिवणकाम, कुंभार, लोहार चांभार,धोबी व प्रेस करणे, पेंटर, सुतार, इलेक्ट्रीशियन, प्लंबर तसेच भंगार रद्दी व्यवसायिक. तसेच ऑडीटर, शेअर ब्रोकर, सी.ए. यांनी व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ज्या क्षेत्रात काम करणार आहेत त्या ठिकाणाच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (नगर परिषद/नगर पंचायत/ ग्रामपंचायत) यांची शिफारस पत्र घेवुन पास मिळवावेत. एल.आय.सी. एजंट यांनी त्यांच्या जिल्हास्तरीय मुख्य अधिकाऱ्यांकडून शिफारस पत्र घ्यावे आणि पारा मिळवून काम सुरु करावे. वरीलपैकी ज्यांचे कामाचे स्वरुप फिरते आहे त्यांनी पास घेवून दिवसभर दररोज पूर्ण वेळ काम करणेस हरकत नाही. तसेच वरील पैकी ज्यांचे काम त्यांचे दुकानात किंवा कार्यालयात होते त्यांना आपले दुकान/कार्यालय विषम तारखेस सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळातच उघडता येईल. वरील व्यवसायिकांशी संबंधित साहित्यांची सर्व दुकाने सुद्धा विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळातच उघडता येतील.

सर्व ई-कॉमर्स कंपन्याना कोणत्याही वस्तूंच्या सेवा नियमाप्रमाणे देता येतील.

• बीड जिल्हयातील सर्व प्रकारचे खाजगी व शासकीय बांधकामे विषम दिनांकास सकाळी ६.३० ते सकाळी १०.०० ही वेळ वगळता सुरु करता येतील. यासाठी सर्व कर्मचारी/कामगार यांचेकडे मागील आदेशाप्रमाणे (दिनांक २३/०४/२०२०) नियंत्रक अधिका-याकडून शिफारस पत्र घेवून पास मिळविल्यानंतरच कर्मचाऱ्यांना कामावर घेता येईल. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक कर्मचारी/कामगार यांनाच काम करण्यासाठी वापरण्यात येईल याची जबाबदारी संबंधित विभाग, मालमत्ताधारक व कंत्राटदार यांची संयुक्तपणे राहील.

• फेब्रिकेशन, इलेक्ट्रीकल साहित्य, होम अपलायन्सेस, फर्निचरची दुकाने, बेकरी, कन्फेक्शनरी ड्रायफूटची दुकाने, स्विट मार्ट, मिठाई भंडार ई. तसेच पूर्ण जिल्यातील सर्व वाहन दुरुस्तीची दुकाने आणि त्यासाठी लागणारे सर्व स्पेअर पार्टसची दुकाने विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळात उघडी राहतील. सदरील दुकानदार यांनी त्यांचे कर्मचारी, स्वत:चा व दुकानाचा पास काढूनच दुकाने उघडावीत.

• सर्व प्रकारचे कपडे, भांडयाची दुकाने, चप्पल व बुट इ.दुकाने दिनांक ५,११ व १७ मे २०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळेतच उघडे राहू शकतील.

• विद्यार्थ्यांची शैक्षणिक पुस्तकांची दुकाने वगळता इतर सर्व पूस्तकांची व स्टेशनरीची दुकाने, कॉस्मेटीक्स. जनरल स्टोअर्सची दुकाने दिनांक o७ व १३ मे २०२० रोजी सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या वेळेत उघडी राहू शकतील.

• केशकर्तनालय चालक आणि ब्यूटी पार्लर चालक यांना आपले दुकान न उघडता केवळ ग्राहकांच्या घरी जावून सेवा देण्यास दररोज पूर्ण वेळ परवानगी देण्यात येत आहे. यासाठी त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांचे शिफारस पत्र घेवून पास मिळवून मगच काम सुरु करता येईल. काम करतांना त्यांना सोबत कोणताही नेपकीन,टॉवेल इ. घेवून जाता येणार नाही. याबाबी त्यांनी ग्राहकांकडून उपलब्ध करुन घ्याव्यात. स्वत:चे सर्व साहित्य डेटॉल/ साबणाच्या पाण्याने स्वच्छ निर्जंतुक करुनच प्रत्येक ग्राहकासाठी वापरावे आणि मास्क/ जाड कपडा वापरुन स्वत:चे नाक व तोंड पूर्णपणे झाकलेले राहील याची खात्री करावी. त्यांना ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी किंवा श्वसनाचा त्रास यापैकी कोणताही त्रास किंचीतही होत असेल तर त्यांनी स्वत:च्या घरीच थांबावे. त्यांनी कोवीड संबंधातील वैयक्तीक स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घ्यावी व सॅनिटायजरचा वारंवार वापर करावा.

• केवळ फळ विक्रेत्यांना शेतक-यांच्या शेतावर जावून फळे खरेदी करून शहरामध्ये फिरुन (एका जागी कोठेही थांबून न राहता तसेच कोणत्याही स्वरुपाचा होलसेल किंवा आडत बाजार न करता फळ विक्री करण्यास दररोज पूर्ण वेळ परवानगी देण्यात येत आहे. त्यांनी या विषयाच्या तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करुन अशा प्रकारचा फळ विक्री परवाना मिळवून नेमून दिलेल्या क्षेत्रातच फळ विक्री करणे बंधनकारक राहील. तसेच शेतावर जावून खरेदी करुन फळे व भाजीपाला तालुका किंवा जिल्हयाबाहेर निर्यात करण्यासाठी (कोणत्याही स्वरुपाचा होलसेल किंवा आडत बाजार न भरवता) परवानगी देण्यात येत आहे.

• दिनांक १० मे २०२० पर्यंत जिल्हयातील सर्व ११ शहरामधील सर्व दुकानदार व नागरीकानी (Needlly) हे होम – डिलेव्हरी अॅप (Home Delivery App) जे की, विना शुल्क सेवा देत आहे ते play store वरुन डाऊनलोड (download) करुन घ्यावे आणि या अॅप मधूनच लागणा-या साहित्याची खरेदी होम डिलेव्हरी स्वरुपात जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करावा. दिनांक १० मे पासून सर्व ११ शहरामधील कोणतेही किराणा दुकान विषम दिनांकास सकाळी ७.०० ते सकाळी ९.३० या काळामध्ये सुद्धा उघडता येणार नाही आणि दुकानानी होम डिलेव्हरीसाठी दिवसभर दररोज काम करणारी यंत्रणा तोपर्यंत कर्मचारी यांचे पाससह उभारावी, अशाच पध्दतीने ठराविक कालांतराने एकेएका प्रकारची ग्राहक उपयोगी वस्तूंची सेवा होम डिलिव्हरी प्रकारात पूर्णपणे समाविष्ट करुन इतर जिवनावश्यक नसलेल्या वरतूंची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल, जेणे करुन इतर उद्योगांना चालना मिळेल.

COMMENTS