मग, जिल्ह्यात एवढे गुन्हे कसे होतात, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना थेट सवाल !

मग, जिल्ह्यात एवढे गुन्हे कसे होतात, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना थेट सवाल !

बीड – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना थेट सवाल केला आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे स्वत:ला बीडच्या गृहमंत्री समजतात. मग, जिल्ह्यात एवढे गुन्हे कसे होतात असा सवाल केला आहे. वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील छेडछाडीमुळे आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड हिच्या कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस अधीक्षक यांना बदली करून जायचे आहे. म्हणून ते जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत नसल्याचा आरोपही  धनंजय मुंडे यांनी केला आहे. सुमित वाघमारे प्रकरण असो, की स्वाती राठोड यांची आत्महत्येची घटना असो, जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पंकजा मुंडे स्वतःला गृहमंत्री समजतात तर मग गुन्हेगारीचे प्रमाण का वाढत आहे याचं उत्तर द्यांनी दिलं पाहिजे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS