शिवसेना-भाजपचा तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्रीपद माझ्याकडे द्या, बीडमधील शेतकय्राची राज्यपालांकडे मागणी!

शिवसेना-भाजपचा तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्रीपद माझ्याकडे द्या, बीडमधील शेतकय्राची राज्यपालांकडे मागणी!

मुंबई – मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहे. शेतकरी आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करत आहे. सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अद्याप भाजप व शिवसेना यांचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याचं दिसत आहे.त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा अशी मागणी बीड जिल्ह्यातील केज येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्याने केली आहे.
श्रीकांत गदळे असं या शेतकय्राचं नाव असून त्यांनी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले पण अद्याप सत्तावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने बहुमत मिळवलं असलं तरी भाजप-सेनेच्या अद्याप चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे दोन पक्षांमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्री पदाचा पदभार माझ्याकडे द्या अशी मागणी या शेतकय्राने केली आहे. तसेच राज्यातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य माणूस अडचणीत असून राज्याच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

तसेच सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना संजय राऊत यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS