बीड –  माजी मंत्री सुरेश धस यांना मोठा धक्का !

बीड –  माजी मंत्री सुरेश धस यांना मोठा धक्का !

बीड – बीड जिल्हा परिषदेमध्ये माजी मंत्री सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर यांना जोरदार धक्का बसला आहे. जिल्हा  परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा व्हीप डावलून भाजप उमेदवाराला मदत केलेल्या 6 जणांचं सदस्यत्व जिल्हाधिका-यांनी रद्द केलं आहे.  सुरेश धस यांचे 5 तर जयदत्त क्षीरसागर यांच्या एका सदस्यानं पक्षाचा व्हीप झुगारला होता. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने त्या 6 सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली होती. 6 जणांचं सदस्यत्व रद्द झाल्यामुळे बीड जिल्हा परिषदेतील राजकीय समिकरणे बदलली जाण्याची शक्यता आहे. कमी सदस्य निवडूण येऊनही राष्ट्रवादीच्या 6 जणांनी भाजपला मतदान केल्यामुळे भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला होता.

COMMENTS