बीडमध्ये भाजपला आणखी एक धक्का, ‘या’ संघटनेचा  राष्ट्रवादीला पाठिंबा!

बीडमध्ये भाजपला आणखी एक धक्का, ‘या’ संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा!

बीड, परळी – लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड लोकसभा मतदारसंघात भाजपला आणखी एक मोठा धक्ता बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई कवाडे गट, तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग (बप्पा) सोनवणे यांना ”महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार , मुकादम व वाहतूक संघटना” यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या भविष्याचा विचार करून तसेच धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला असल्याचं संघटनेचे राज्य सचिव प्रदीप भांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. बीडमध्ये आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आज ”महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार , मुकादम व वाहतूक संघटना” यांनी आज जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS