बीडमध्ये प्रितम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित, चुरशीची लढत होणार ?

बीडमध्ये प्रितम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित, चुरशीची लढत होणार ?

बीड – आगामी लोकसभेसाठी बीडमध्ये राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमध्ये अमहसिंह पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित विरुद्ध भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे असा सामना रंगणार असलयाचं दिसत आहे.

यापूर्वी विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह, विधानसभा आमदार जयदत्त क्षीरसागर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. परंतु धनंजय मुंडे यांना केंद्रात जाण्यात रस नाही तर जयदत्त क्षीरसागर यांची भाजपशी जवळीकता वाढली असल्यामुळे त्यांना डावललं गेलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरसिंह पंडित यांना याठिकाणी उमेदवारी दिली गेली असल्याची माहिती आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे दौऱ्यावर आले होते . त्यावेळी त्यांनी खा. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. या मतदारसंघात येणाऱ्या लोकसभेला परिस्थिती वेगळी आहे. गेल्या साडेचार वर्षात या मतदारसंघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कामगिरीमुळे त्यांना माणनारा वर्ग जिल्ह्यात वाढला आहे.

बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे वाढलेले वर्चस्व आणि परळी नगर पालिका राष्ट्रवादीकडे गेल्याने यावेळी चित्र वेगळे पहावयास मिळणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी हा विषय चिंतेचा आहे. त्यावर मार्ग काढून निवडणुकीत काय चमत्कार घडवणार हे आगामी काळातच समजणार आहे.

COMMENTS