बीड लोकसभेसाठी धनगर समाजाच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी द्या, धनगर समाजाची शरद पवारांकडे मागणी !

बीड लोकसभेसाठी धनगर समाजाच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी द्या, धनगर समाजाची शरद पवारांकडे मागणी !

बीड – बीड लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यात 3 ते 3.25 लाख धनगर समाजाचं मताधीक्य असतांनाही धनगर समाजाला एकाही राजकीय पक्षाने खासदार किंवा आमदारकीची अद्यापही उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे धारुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आणि धनगर समाजाचे नेते, तसेच धारुर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष माधवराव निर्मळ यांना उमेदवारी देण्याची मागणी बीड जिल्ह्यातील धनगर समाजाकडून केली जात आहे.

दरम्यान याबाबत महापॉलिटिक्सनं माधवराव निर्मळ यांच्याशी बातचीत केली असता, मी अजून पक्षाकडे अशी मागणी केलेली नाही परंतु जिल्ह्यातील सर्व धनगर समाजबांधवांकडून ही मागणी केली जात आहे. त्यांच्या या मागणीची दखल पक्षानं घेतली आणि मला जर ही संधी मिळाली तर आपण लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं निर्मळ यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील समाज बांधवांची मागणी आणि मताधिक्य लक्षात घेतला निर्मळ यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळणार का याकडे जिल्ह्यातील धनगर बांधवांचे लक्ष लागलं आहे.

COMMENTS