पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया !

पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया !

बीड – बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या प्रितम मुंडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा त्यांनी पराभव केला आहे. विजय मिळवल्यानंतर भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी बीडमधील सर्व जनतेचे आभार मानले आहेत. तसेच जनतेनं ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन असेही प्रितम मुंडे यांनी म्हटलं आहे. 29 फेरी अखेर 1 लाख 73 हजार 863 मतांनी प्रितम मुंडे आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित झाला आहे. पाच मतदार संघातील मोजणी संपली असून केवळ आष्टी मतदारसंघातील 3 फेऱ्या शिल्लक आहेत. त्यानंतर बीडमधील चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सर्व जनतेचे आभार मानले आहेत.बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

थकलो आहे जरी अजुन मी झुकलो नाही!

जिंकलो नसलो तरी अजुन मी हरलो नाही!

अरे संकटानो अजुन दम लावा,

कारण थांबलो असलो तरी अजुन मी संपलो नाही!!!

निवडणुकीच्या अवघ्या थोड्या दिवसा आधी माझी उमेदवारी जाहीर झाली. शक्य होईल तेवढे मी व बीडच्या जनतेने कष्ट घेतले. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी कष्ट घेतले. सामान्य कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे जनतेने मला भरभरुन प्रेम दिले.

तुमच्या प्रेमापुढे हा जय पराजय नगण्य आहे, तुमची-माझी नाळ कधीही तुटणार नाही.या लोकसभा निवडणुकीत मला आशिर्वादरुपी मतदान केलेल्या व न केलेल्या सर्व बीड जनतेचे मन:पुर्वक आभार!!!

सदैव तुमच्या सेवेत…

तुमचा बजरंग सोनवणे

 

 

COMMENTS