मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन बीडमधील तरुणाची आत्महत्या !

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन बीडमधील तरुणाची आत्महत्या !

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात एका सुशिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या अभिजित देशमुख (वय-३५ वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी घराजवळील झाडावर त्याचा मृतदेह आढळून आला. अभिजीत याच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील ही पाचवी आत्महत्या आहे. औरंगाबादमधील कायगाव टोका या गावात काकासाहेब शिंदे यांनी 22 जुलै रोजी आत्महत्या केली. त्यानंतर 24 जुलै रोजी औरंगाबादमधील गंगापूर येथील देवगाव रंगारी गावातील जगन्नाथ सोनवणे या तरुणानं विष घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर 29 जुलै रोजी नांदेडमधील दाभड येथील कचरु कल्याणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर औरंगाबादमधील प्रमोद होरे पाटील या तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आज केजमधील अभिजित देशमुख याने आत्महत्या केल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन वातावरण चिघळत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS