बीडमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड, आणखी एका नेत्याचा पक्षात प्रवेश!

बीडमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड, आणखी एका नेत्याचा पक्षात प्रवेश!

बीड – लोकसभा निवडणुकीदरम्यान बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं आणखी जड झालं असून माजलगावातील मनसेचे विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष शिवाजी काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकसभेसाठी पाठींबा देऊन त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून शिवाजी काळे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा सोळंके, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला असल्याचं शिवाजी काळे यांनी म्हटलं आहे. शिवाजी काळे यांच्यासह विकास तिडके, दशरथ वाघमारे, शहाजी काळे, दत्ता काळे, सचिन तिडके, अनिल राठोड, अमोल माचवे, राजू पवार या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

COMMENTS