यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते गौरव !

यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते गौरव !

बीड – शासन आणि प्रशासन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानाने प्रत्येकाला दिलेले स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना प्रश्नांवर कुणाच्या प्रभावाखाली न येता योग्य काम करणे महत्त्वाचे ठरेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोग ( यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार विनायक मेटे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

पालकमंत्री महोदय म्हणाले, मागासलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नाही…. तर यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या अतिशय अवघड स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या वैभवशाली विद्यार्थ्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आपण संपादन केलेल्या या नेत्रदीपक यशामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा उंचावली असून हा
मागासलेला कसं असू शकतो.

ते पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बीड जिल्ह्याचा मागासलेल्या जिल्हा असा कलंक कायमचा पुसून टाकू असा विश्वास आहे. या नेत्रदीपक यशामुळे जिल्ह्याची प्रतिमा उंचावली आहे आता जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवण्याची किमया तुमच्या कामातून होईल असे मंत्री श्री मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संकटाला तोंड देण्यासाठी सिद्ध व्हावे, जिथे काम कराल त्या जिल्ह्यातील जनतेचे आणि पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले,हे यश मिळवून प्रशासकीय सेवेत आल्याने तुमचे जीवन आता बदलत असून सत्यनिष्ठा, ज्ञान आणि नियम याद्वारे देश सेवा करावी असे मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री महोदयांच्या हस्ते
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळालेल्या बीड जिल्ह्यातील मंदार पत्की (देशात २२ वा), डॉ. प्रसन्न लोध( रँक ५२४) व अंबेजोगाई येथील वैभव वाघमारे (७७१ रँक) यांचा गौरव करण्यात आला यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत यश मिळालेल्या प्रियांका मिसाळ ( एम पी एस सी ), योगेश रांजणकर ( एम पी एस सी ), डॉ सोनाली जगताप ( एम पी एस सी ), जयंत मंगले,
अजित बांगर( एम पी एस सी ) यातील उपस्थित यशस्वी उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे महिला ग्राम संघाचा धनादेश देऊन सत्कार

धारुर तालुक्यातील कारी येथील आदर्श महिला ग्रामसंघाचा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्तेे
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ंतर्गत त्यांना सहा लक्ष 50 हजार रुपये पुरस्काराचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश अध्यक्षा श्रीमती आशा पांचाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी स्वीकारला.आदर्श महिला ग्रामसंघाने बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमाद्वारे उत्कृष्ट कार्य करत बचत गट सदस्यांना आर्थिक विकास घडवून आणला आहे.

मजुर फेडरेशनतर्फे कोविड मदत निधी 21 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द

कोरोना आपत्ती मुळे बीड जिल्हा मजुर फेडरेशनतर्फे अध्यक्ष बन्सीअण्णा शिरसाट, प्रभारी जिल्हा सहनिबंधक श्री मोटेे आणि फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांनी सहायता निधीसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

COMMENTS