बीड – नारायणवाडीतील नागरिक ठाम, बहिष्कारामुळे मुकले मतदानाला !

बीड – नारायणवाडीतील नागरिक ठाम, बहिष्कारामुळे मुकले मतदानाला !

बीड – स्वातंत्र काळापासुन लोकशाही आमलात आली या लोकशाहीला आज जवळपास ७० वर्षाचा कालावधी लोटत आला आहे. परंतु एवढ्या दिर्घ काळानंतरही ग्रामीण भागातील नागरीकांना रस्ते पाणी व इतर मुलभुत सुविधा मिळवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटून संघर्ष करावा लागत आहे. हे नागरीकांचे दुर्भाग्यच समजावे लागेल. शिरुर कासार तालुक्यातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांकडून लोकसभा निवडणुकावर टाकलेला बहिष्कार प्रशासकीय धोरणामुळे शेवटाला गेला असून नागरिकांना लोकशाहीच्या प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले आहे.

शिरुर कासार तालुक्यातील नारायणवाडी हे गाव दोन विधानसभा मतदारसंघाने सरहद्दीवर वसलेले १३५० लोकसंख्याचे गाव आहे. या गावातून बाहेर पडण्यासाठी केवळ एकच रस्ता तोही कायम दुर्लक्षीत आहे. यामुळे ग्रामस्थांना तिनही मोसमात मरणयातना भोगाव्या लागत असल्याने समस्थ नागरिक एकवटले आणी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर ७३३मतदारांनी बहिष्कार टाकून गावाच्या रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना तीन महिन्यापुर्वी बहिष्काराचे निवेदन दिले गेले होते. परंतु या तीन महिन्याच्या कालखंडात या गावाकडे एकही प्रशासकीय अधिकारी फिरकला नसल्याने गावकरी अधिक संतापले व ऐन निवडणुकाच्या दिवशी शिरुर तहसिलदार यांनी या गावाकडे धाव घेतली. परंतु ग्रामस्थांनी आम्हाला केवळ जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबतीत लेखी आश्वासन दिले तरच मतदान करू असे बजावल्याने तहसिलदार व त्यांच्या शिष्टमंडळाला माघारी परतावे लागले व यानंतर मतदानाची वेळ संपेपर्यंत कोणताच प्रशासकीय अधिकारी या गावाकडे फिरकला नसल्याने ग्रामस्थांना लोकशाहीच्या अधिकाराला नागरिकांना मुकावे लागले आहे.

नारायणवाडी ग्रामस्थांच्या मागण्या

शिरुर कासार तालुक्यातील नारायणवाडी हे गाव निमगाव मायंबा या गटग्रामपंचायतीला जोडलेले गाव असून या गावातून बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता आहे.या रस्त्याची निर्मिती करून नारायणवाडी ते निमगाव मायंबा हा रस्ता करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थाकडून केलेली आहे.

प्रशासन व लोकप्रतिनिधीवरचा विश्वास उडाला

ग्रामस्थांनी टाकलेल्या बहिष्कारावर प्रशासकीय पातळी व लोकप्रतिनिधीनी कुठल्याच प्रकारे दखल घेतली नसल्याने ग्रामस्थाकडून या धोरणाचा संताप व्यक्त करण्यात आला असून आमचा यांच्यावर आता विश्वास उरलेला नाही अश्या बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी दिल्या व आमचा हा संघर्ष कायम सुरू राहणार असल्याची माहिती दिली.

मतदान केंद्रावर शुकशुकाट

समस्त नारायणवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला असतानादेखील प्रशासकीय पातळीवरून गावात मतदान केंद्र सुरू केले होते. परंतु ग्रामस्थांच्या बहिष्कार यानंतर या मतदान केंद्रावर मतदारा अभावी दिवसभर शुकशुकाट पाहण्यासाठी मिळाला असून समस्त ग्रामस्थ गावच्या एका पारावर एकवटलेले होते.दिवसभर एकाही मतदाराने मतदान केले नाही.

COMMENTS