बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांना संदीप क्षीरसागरांचा धक्का, खंदा समर्थक राष्ट्रवादीत !

बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांना संदीप क्षीरसागरांचा धक्का, खंदा समर्थक राष्ट्रवादीत !

बीड – राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले आणि नुकतेच मंत्री झालेले जयदत्त क्षीरसागर यांना बीडमध्ये जोरदार धक्का बसला आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्टेरवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी हा धक्का दिला आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे खंदे समर्थक असलेले हमीद उर्फ बाबा खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत माजी आ सय्यद सलीम, संदीप क्षीरसागर,  शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, नगरसेवक खदीरभाई जवरीवाले, अश्फाक इनामदार, जैतुला खान, ऍड इरफान बागवान, बरकत पठाण, परवेज देशमुख,आपा इंदूरे आदींनी केले.

दरम्यान बाबा खान हे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना फोडण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आलं आहे. त्याचबरोबर इतरही काही कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.त्यामुळे मंत्रीपद मिळूनही बीडमधील अनेक कार्यकर्ते मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत असल्याचे दिसत आहे.

COMMENTS