‘या’ तारखेपर्यंत लागणार बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल !

‘या’ तारखेपर्यंत लागणार बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल !

बीड बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत मुख्य निवडणूक आयोगाने 11 जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे 11 जुनपर्यंत या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. बीड नगर परिषदेच्या दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवलं होतं. परंतु निवडणूक आयोगाने त्यांना मतपत्रिका यापूर्वी तयार झालेल्या असल्याने मतदानाचा अधिकार दिला होता. त्यानंतर राज्यमंत्र्यांचे आदेश रद्द करण्यासाठी बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह नऊ अपात्र घोषित नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. शिवाय याविरोधात दुसरीही एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल स्थगित करण्यात आला होता.

दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली होती. 24 मे रोजी सर्व निकाल जाहीर करण्यात आले. परंतु  या निवडणुकीबाबत याचिका दाखल झाल्यामुळे बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नव्हती. कोर्टाचा आदेश न आल्यामुळे या जागेचा निकाल जाहीर न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. परंतु अखेर 11 जूनपर्यंत मतमोजणी करण्याचे आदेश आता देण्यात आले असल्यामुळे 11 जुनच्या आत या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत झाली आहे. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS