मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला !

मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला !

बीड –  मला गोपीनाथ मुंडेंनी मैदानी खेळ कसे खेळावे लागतात हे देखील शिकवले आहे. त्यामुळे मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नसल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली. आपण पहिल्या बॉललाच विकेट घेणार असे सांगून पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी टोला लगावला होतात. त्यावर पंकजा मुंडे यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान मुंडे साहेबांचं आजही नाव निघाले तर देशातलं अख्ख राजकारण ढवळून निघते. त्यामुळे साहेबांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे जायचे नाही तर मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसेच एकेकाळी ज्या जिल्ह्यांमध्ये 6 आमदारांपैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, तरी जिल्ह्यात कोणत्याही विकासाचे काम झाले नाहीत. आम्ही विकासाचे काम करतो आणि आमच्या भावांना मात्र तोडपाणी करण्याचे काम असते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

COMMENTS