बीड जिल्ह्यात भाजपला धक्का, आणखी एक नेता सोडणार भाजपची साथ!

बीड जिल्ह्यात भाजपला धक्का, आणखी एक नेता सोडणार भाजपची साथ!

बीड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे हे पालकमंत्री पंकजा मुंडेंवर  नाराज असल्याची माहिती आहे. आखाडे यांना ओबीसी महामंडळावर घेण्याचे आश्वासन मुंडेंनी दिले होते. पण, ऐनवेळी शिवसेनेच्या नेत्याला ही संधी दिली गेली.

त्यामुळे आखाडे नाराज असून ते लवकरच भाजपची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. आखाडे यांच्या मागे जिल्ह्यातील माळी समाजातील मोठा घटक आहे. आखाडेंना भाजपच्या सत्तेचा काहीच फायदा झाला नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. आखाडेंनी भाजपची साथ सोडली तर आगामी निवडणुकीत भाजपला चांगला फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.

दरम्यान गेल्या १४ वर्षांपासून कल्याण आखाडे गोपीनाथ मुंडेंच्या सोबत आहेत. आखाडेंना भाजपसोबत जोडण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा हात आहे. सावता परिषदेच्या माध्यमातून आखाडेंनी जिल्ह्यात माळी समजाला संघटीत केले आहे. जिल्ह्यासह राज्यातील इतर ठिकाणीही त्यांनी सावता परिषदेचे काम वाढवले आहे. इतक्या दिवसांची भाजपची साथ सोडून आखाडे जाणार का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

COMMENTS