बीड – भाजपला मोठा धक्का, ज्येष्ठ नेता आजच्या प्रचार सभेदरम्यान करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

बीड – भाजपला मोठा धक्का, ज्येष्ठ नेता आजच्या प्रचार सभेदरम्यान करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

बीड, परळी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेते दत्ता पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार आहेत. आज राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची संयुक्त प्रचार सभा परळी येथे पार पडत आहे. या प्रचारसभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दत्ता पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान भाजपमधील कार्यकर्त्यांना पक्षात योग्य ती वागणूक दिली जात नाही. ही सर्व नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात मळमळ असून अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं दत्ता पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आमच्या अस्मितेच्या प्रश्नाला पंकजा मुंडे यांनी बगल दिली असल्याचा आरोपही दत्ता पाटील यांनी केला आहे. तसेच हा तालुका भारतीय जनता पार्टीमुक्त होईल अशीच परिस्थिती सध्या असून याचे परिणाम भविष्य काळात दिसतील असा इशाराही दत्ता पाटील यांनी यावेळी दिली आहे.

COMMENTS