धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून सुरू असलेल्या थर्मल टेस्टिंगला परळीकरांचा उत्तम प्रतिसाद !

धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून सुरू असलेल्या थर्मल टेस्टिंगला परळीकरांचा उत्तम प्रतिसाद !

चौथ्या दिवस अखेर आकडा ५० हजार पार!

परळी – बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान व मुंबई येथील वन रुपी क्लीनिक च्या माध्यमातून परळी मतदारसंघात सुरू असलेल्या थर्मल टेस्टिंग ला परळीकर नागरिक उत्तम प्रतिसाद देत असून आज चौथ्या दिवसअखेर वैद्यकीय तपासणी चा आकडा ५० हजाराच्या पार गेला आहे.

आज चौथ्या दिवशी प्रभाग क्रमांक ५ मध्ये या तपासणीला सुरुवात करण्यात आली यावेळी नगरसेवक गोपाळ आंधळे, व्यंकटेश शिंदे, सचिन लगड, विजय भोयटे, सोमनाथ राजनाळे, राहुल क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी घरोघरी जाऊन समन्वय साधला.

प्रभाग क्रमांक १६ मधील माणिकनगर भागातही टेस्टिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला, याठिकाणी अमित केंद्रे, धर्मराज खोसे, अजय सुपेकर, गणेश वारकरी, अनिल भोसले आदींनी नागरिकांशी संवाद साधत वैद्यकीय तपासणीला मदत केली.

चौथ्या दिवशीच्या उत्तरार्धात प्रभाग ११ मधील शास्त्रीनगर, नाथनगर आदी भागांमध्ये तपासणी करण्यात आली; यावेळी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती भाऊसाहेब कराड, नगरसेवक संजय फड, बाळासाहेब वाघ, ज्ञानेश्वर होळंबे, प्रदीप जाधवर, गणेश ढगे, अनिल भोसले श्रीनिवास ढगे आदींनी तपासणी उपक्रम यशस्वी करून घेतला.

डॉ. राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली तपासणी करत असलेल्या वन रुपी क्लिनिकच्या टीमने आज दिवसभरात १३७०० नगरिकांचे थर्मल टेस्टिंग पूर्ण केले तर आजच्या दिवसात किरकोळ ताप असलेले १५ रुग्ण आढळले असून त्यांना कोरोना चाचणी साठी (Swab test) सल्ला देण्यात आला आहे. परळीत या चार दिवसात एकूण ५० हजार नागरिकांची थर्मल टेस्ट पूर्ण झाली असून एकूण ४६ ताप असलेले रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली.

COMMENTS