चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची 19 ऑगस्टला निवडणूक, सर्वच पक्षांमध्ये जोरदार चुरस !

चंद्रपूर – भद्रावती नगरपालिकेची 19 ऑगस्टला निवडणूक, सर्वच पक्षांमध्ये जोरदार चुरस !

चंद्रपूर – जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेची १९ ऑगस्ट रोजी निवडणूक पार पडणार आहे. याठिकाणी शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असून या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.  भाजपच्या दिग्गज नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आघाडी करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. याठिकाणी आंबेडकरी मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे या मतदारांची मतं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान गेली 20 वर्षांपासून शिवसेनेची याठिकाणी सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग पोहचवण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडूनही या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे 20 वर्षांपासूनची सत्ता कायम ठेवण्यात शिवसेनेला यश मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS