राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या, खा. धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी !

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या, खा. धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी !

नवी दिल्ली – राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत केली आहे. लोकसभेत लक्षवेधी उपस्थित करताना महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे शाहू महाराजांनाही भारतरत्न देण्याची मागणी महाडिक यांनी केली आहे.

दरम्यान राजर्षी शाहू महाराज यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या सामाजिक इतिहासामध्ये महत्त्वाचं कार्य केलं आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची गोष्ट केली जाते. परंतु देशात पहिलं आरक्षण शाहू महाराज यांनी आपल्या संस्थांमधून लागू केलं अल्याचंही महाडिक यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच शाहू महाराज हे खरेखुरे लोकराजे होते. त्यांनी शिक्षण, साहित्य कला, क्रीडा, कृषी या सर्व क्षेत्रात मोठं काम केलं आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असं महाडिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS