‘भारिप-बहूजन महासंघ’ हे नाव इतिहासजमा होणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!

‘भारिप-बहूजन महासंघ’ हे नाव इतिहासजमा होणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा!

अकोला –  ‘भारिप-बहूजन महासंघ’ हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ‘भारिप-बहूजन महासंघ’ हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकरांच्या नेत्रूत्वात तयार झालेल्या ‘वंचित बहूजन आघाडी’त हा पक्ष विसर्जित करणार असल्याचं आज प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणातल्या रिपब्लिकन चळवळीतील ‘भारिप-बहूजन महासंघ’ नावाचं ‘पर्व’ संपणार असून पक्ष विसर्जित करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोला येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे.

COMMENTS