भास्कर जाधवांचा अखेर शिवसेनेत प्रवेश!

भास्कर जाधवांचा अखेर शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते.

भास्कर जाधव यांनी आज सकाळी औरंगाबाद येथे जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. यावेळी बागडे यांनी जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला. विशेष म्हणजे भास्कर जाधव यांच्यासाठी शिवसेनेनं आज स्पेशल विमानाची व्यवस्था केली होती. स्पेशल विमानाने जाधव रत्नागिरीहून औरंगाबादला गेले. औरंगाबादमध्ये जाऊन त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS