राष्ट्रवादीची मोठी खेळी, भास्कर जाधवांविरोधात शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला देणार उमेदवारी?

राष्ट्रवादीची मोठी खेळी, भास्कर जाधवांविरोधात शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला देणार उमेदवारी?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता या नेत्यांपुढे तगडा उमेदवार उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरु आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे गुहागर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच कुणबी समाजाचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सहदेव बेटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे गुहागरमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. बेटकर यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत शिवसेनेविरोधात उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे बेटकर राष्ट्रवादीत गेले तर गुहागारमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS