त्यावेळी शरद पवारांनी माझ ऐकलं असतं तर पक्षावर आज ही वेळ आलीच नसती – भास्कर जाधव

त्यावेळी शरद पवारांनी माझ ऐकलं असतं तर पक्षावर आज ही वेळ आलीच नसती – भास्कर जाधव

सिंधुदुर्ग – राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आपण मुंबई अध्यक्षपद मागितले होते. पण, त्यांनी ते दिले नाही. मुंबई अध्यक्षपद मला मिळाले असते तर पक्षावर आज ही वेळ आली नसती. असं म्हणत जाधव यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. भास्कर जाधव हे सिंधुदुर्गात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.कोकणातील पक्षाच्या स्थितीकडेही नेतृत्त्वाने दुर्लक्ष केली असल्याची खंत जाधव यांनी बोलून दाखवली आहे.

सक्षणा सलगर यांची अहिरांवर टीका

दरम्यान सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझ्या ह्रदयात शरद पवारांबाबत अजूनही प्रेम असल्याचं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी जोरदार टीका केली आहे. सचिन अहिर यांच्या शरद पवार एवढेच जर ह्रदयात होते तर मग त्यांनी असा प्रेमभंग का केला? असा सवाल करत स्वत:च्या स्वार्थापायी आणि सत्तेच्या हव्यासापोटी अहिर शिवसेनेत गेले आहेत, अशी जोरदार टीका सक्षणा सलगर यांनी केली आहे.

COMMENTS