उद्धव ठाकरेंसमोरच भास्कर जाधवांचे नाराजीनाट्य,दोन-तीन वेळा आवाज देऊनही प्रतिसाद दिला नाही !

उद्धव ठाकरेंसमोरच भास्कर जाधवांचे नाराजीनाट्य,दोन-तीन वेळा आवाज देऊनही प्रतिसाद दिला नाही !

रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे नाराजीनाट्य पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन झाले. या कार्यक्रमादरम्यान मंचावर उपस्थित मान्यवरांनी उद्धव ठाकरेंचा सत्कार केला. या सत्कारानंतर फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरुन जाधव यांची नाराजी समोर आली असून तियांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान यानंतर विनायक राऊत स्वत: भास्कर जाधव यांना बोलवण्यासाठी गेले. त्यावेळी राऊतांनी जाधवांना सगळ्यांसोबत यायची विनंती केली. मात्र तेव्हाही त्यांनी हात झटकत नकार दर्शवला. तसेच त्यांना या कार्यक्रमासाठी नारळ वाढवण्याची विनंती करण्यास सांगितल्यावरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जाधव यांची नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS