“शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार, भातखळकर, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी !”

“शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार, भातखळकर, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी !”

नागपूर – शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्यामुळे आज विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी असले भलतेसलते मुद्दे काढू नका, असं वक्तव्य केलं त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेत गदारोळ सुरू केला. या गदारोळात 10 मिनिटे कामकाज तहकूब करण्यात आले.

दरम्यान शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार काढल्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.तसेच भातखळकर यांचे निलंबन केले जात नाही तोपर्यंत कामकाज सुरू होऊ देणार नाही, असले मनुवादी विचारांचे लोक असे काहीही बोलून अपमान करत असल्याची जोरदार टीका अजित पवार यांनी केली.

दरम्यान आपण माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना उद्देशून बोललो, शिवाजी महाराजांविषयी नाही. मी माझे शब्द मागे घेतो. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS