संभाजी भिडेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट!

संभाजी भिडेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट!

कोल्हापूर – शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन संभाजी भिडे यांनी भेट घेतली आहे.त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे ही भेट नेमकी का झाली असावी याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.तर तब्बल 20 मिनिटं यांच्यात चर्चा सुरू होती. या ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भिडे गुरुजी यांनी चंद्रकांच पाटलांची भेट का घेतली याबाबत तर्कवितर्क  लावले जात आहेत.

COMMENTS