भाजपचे खासदार कपील पाटलांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध, बंडखोरी होण्याची शक्यता !

भाजपचे खासदार कपील पाटलांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध, बंडखोरी होण्याची शक्यता !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती झाली आहे. त्यामुळे काही मतदारसंघात शिवसेना-भाजपकडून पूर्वीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार कपील पाटील यांनाही या निवडणुकीतही उमेदवारी दिली जाणार आहे. परंतु भिवंडीतील शिसेनेच्या स्थानिक पदाधीका-यांनी खासदार कपिल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

कपील पाटील

दरम्यान भाजपाने कपील पाटील यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेत बंडखोरी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी कपील पाटील यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कपील पाटील यांना उमेदवारी दिली जाणार का ? हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS