नाणार प्रकल्पावरुन छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना चाणाक्ष प्रश्न !

नाणार प्रकल्पावरुन छगन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना चाणाक्ष प्रश्न !

नागपूर – नाणार प्रकल्प कोकणातच होणार असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोस्टल म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील आहे. त्यामुळे तो विदर्भात येऊ शकत नाही. परंतु जमिनीवरील रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभा राहू शकतो. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे पाठविण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगुन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाणार प्रकल्पावरुन चाणाक्ष प्रश्न विचारला आहे. नाणारचा प्रकल्प रद्द केल्यानंतर तो विदर्भात येणार की आणखी दुसरा प्रकल्प उभा राहणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना भुजबळ यांनी विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी, भुजबळ साहेब आपण चाणाक्ष आहात. अनुभवी आहात. कोणत्या वेळी कोणता प्रश्न विचारावा याची पूर्ण जाण आपणास आहे, असं म्हणत जमिनीवरील प्रकल्प विदर्भात शक्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले.

COMMENTS