छगन भुजबळ राज ठाकरे भेटीची “ही” आहे अंदर की बात ?

छगन भुजबळ राज ठाकरे भेटीची “ही” आहे अंदर की बात ?

मुंबई – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांच्या लग्नाला छगन भुजबळ यांच्या पत्नी येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे भुजबळ यांनी पत्नीसमवेत राज यांची भेट घेतली असं सांगण्यात येतंय. भुजबळ यांच्यासोबत माजी खासदार समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनीही राज यांची भेट घेतली आहे.

कारण सपत्नीक भेटीचं सांगितलं जात असंल तरी राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात अर्धा तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसंच समीर भुजबळ हे आगामी लोकसभा निवडणूक नाशिकमधून लढण्याची चर्चा आहे. त्यासाठी मनसेनं समीर भुजबळ यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी राज यांच्याकडे केल्याचं कळतंय. राज यांनी त्यावर काय प्रतिसाद दिला हे अजून गुलदसत्यात आहे. मनसेची नाशिकमध्ये चांगली ताकद आहे. गेल्यावेळी महापालिकेची सत्ता मनसेकडे होती. तसंच 2009 मध्ये मनसेचे तीन आमदार नाशिकमधून निवडणू आले होते.

मनसेला काँग्रेस आघाडीमध्ये घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सुरूवातीपासूनच आग्रही आहे. तशा प्रकारची अनेक वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वेळोवेळी आली आहेत. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी सर्व 48 मतदारसंघ लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका काँग्रेस आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी भागात ब-यापैकी ताकद असलेल्या मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. काँग्रेसमध्ये काही नेत्यांचा मनसेला आघाडी घेण्यासाठी विरोध आहे. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला विरोध करणारी काँग्रेसही काही प्रमाणात राज यांना आघाडीत घेण्यास सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे आघाडीमध्ये आले तर उत्तमच पण ते आघाडीत आले नाहीत तरी त्यांनी नाशिकमध्ये समीर भुजबळ यांच्याा उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केल्याचं कळतंय.

COMMENTS