ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण नको – छगन भुजबळ

ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण नको – छगन भुजबळ

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्रटीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारने वेगळी उपाययोजना करावी. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते  नाशिकमधील कार्यक्रमा बोल होते.

दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे,  असे सर्वच पक्षाचे मत असून राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय कसा घेतात त्यावर आमची पुढील दिशा ठरेल. सध्या त्यावर बोलण्यात अर्थ नसल्याचंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS