सर्वपक्षीय बैठकीनंतर छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका केली स्पष्ट, काढलं पत्रक !

सर्वपक्षीय बैठकीनंतर छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका केली स्पष्ट, काढलं पत्रक !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील उपस्थिती लावली होती. बैठकीनंतर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून याबाबत त्यांनी पत्रक काढलं आहे. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु मराठा आरक्षणासाठी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी केली आहे.

दरम्यान 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण वाढवून देशातील मराठासहित इतर सर्व घटकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी घटनेत आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आग्रह धरावा त्याला आमचा पाठिंबा राहिल असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच 72 हजार रिकाम्या जागी जी नोकरभरती करण्यात येणार आहे. त्यात मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून एससी-एसटी-ओबीसी सहित सर्व समाजाची नोकरभरती करावी. जेणेकरुन इतर समाजावर अन्याय होणार नाही असंही या पत्रकात भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS