काॅंग्रेस काळात चौकशी संस्थेचा गैरवापर – फडणवीस

काॅंग्रेस काळात चौकशी संस्थेचा गैरवापर – फडणवीस

सिंधुदुर्ग – ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते.मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही.भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही.काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे.अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर हून आंबोली मार्गे गोव्याला जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते.

यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,अतुल काळसेकर,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,उपसभापती शितल राऊळ,व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

फडणवीस म्हणाले,बांधकाम क्षेत्राबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे.यातील घोटाळे मी स्वत: उघडकीस आणले आहेत.त्याची चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले.

COMMENTS