शिवसेनेला मोठा धक्का, “या” नेत्याचा नाट्यमयरित्या रात्री भाजपात प्रवेश !

शिवसेनेला मोठा धक्का, “या” नेत्याचा नाट्यमयरित्या रात्री भाजपात प्रवेश !

मुंबई – शिवसनेला मोठा धक्का बसला आहे. शिवेसनेचा बडा मासा भाजपने कोणतीही कुणकुण न लावता गळाला लावला आहे. पक्षाचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी रात्री नाट्यमयरित्या भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हाजी अराफात शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महामंडळ नियुक्त्यांमध्ये शेख यांची राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती, मात्र ती शिवसेनेकडून नाही तर भाजप कडून होती अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अराफत शेख यांची आयोगाच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षात उद्धव ठाकरेंकडे लॉबिंग सुरु होती. पण नागपूरचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी लावण्याचं पक्षात ठरलं. त्यातच शेख यांची भाजपकडून आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. आणि त्यानंतर प्रवेशाचा नाट्यमय सोहळा झाला. खरंतर हाजी आराफत शेख आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या जेंव्हा जोरदार वाद झाला होता. तेंव्हाच शेख शिवसेनेला जय महाराष्ट्र करतील अशी शक्यता होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांची समजूत काढली होती. हाजी अराफात शेख हे पूर्वी मनसेत होते. राज ठाकरे यांच्यावर टीका करुन ते शिवसेनेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्ष बदलला आहे. आता भाजपात ते टिकतात का ? ते पहावं लागेल.