भाजप नाही तर ‘हा’ पक्ष बिहारमध्ये ठरला सर्वात मोठा पक्ष, पाहा निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट्स!

भाजप नाही तर ‘हा’ पक्ष बिहारमध्ये ठरला सर्वात मोठा पक्ष, पाहा निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट्स!

मुंबई – बिहार निवडणुकीची मतमेजणी अजूनही सुरुच आहे. एनडीए आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. त्यामुळे  सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून 173 जागांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. 56 जागांवरील विजयासह राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर 48 जागा जिंकत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहो. जेडीयू 30, काँग्रेस 13, तर डाव्या पक्ष 12 जागांवर विजयी झाले आहेत.

दरम्यान या निकालावरुन एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. सुरुवातीला स्पष्ट राजदकडे आणि नंतर बराच काळ भाजपकडे झुकलेली ही निवडणूक आता त्रिशंकू होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. अशातच या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 4 जागांवर यश आलं आहे. तर 1 जागेवर एमआयएम आघाडीवर आहे. त्यामुळे बिहारचा निकाल त्रिशंकू लागला तर एमआयएम किंग मेकर ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ओवेसींचा पक्ष कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेऊन बिहारच्या जनतेचे आणि मित्र पक्षांचे त्यांनी आभार मानले आहेत.

अशातच तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून मतमोजणीत गोंधळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असं आरजेडीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकूण जागा – 243

एनडीए – 121

महागठबंधन – 118

इतर – 08

———

महागठबंधन

आरजेडी – 76

काँग्रेस – 19

इतर – 16

एनडीए

जेडीयू – 43

भाजप – 73

व्हीआयपी – 04

इतर – 04

एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु आता महागठबंधन पिछाडीवर असल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे.

एक्झिट पोल्स

सर्व पोलचा एकत्रित अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी – काँग्रेस – 122

भाजप – जेडीयू – 112

इतर –    09

रिपब्लिकचा अंदाज

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117

बीजेपी – जेडीयू -118 ते 138

इतर          – 5 ते 12

 

टीव्ही 9 चा अंदाज

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125

बीजेपी – जेडीयू – 110 ते 120

इतर          – 15 ते 20

C Voter चा अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी-काँग्रेस – 120

बीजेपी-जेडीयू – 116

इतर – 07

मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.

COMMENTS