भाजपचे 45 आमदार डेंजर झोनमध्ये ?

भाजपचे 45 आमदार डेंजर झोनमध्ये ?

मुंबई – भाजपचे 45 आमदार डेंजर झोनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालाच्या माहितीनुसार भाजपाचे ४० टक्के म्हणजे ४५ आमदारांची चार वर्षातील कामगिरी खराब असून त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे या अहवालावरुन आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्यासाठी भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान भाजपने घेतलेल्या या बैठकीत आमदार आणि खासदारांना बंद लिफाफा देण्यात आला. हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना देण्यात आला. या लिफाफ्यामध्ये त्यांची कामगिरी देण्यात आली आहे. चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात ४५ आमदार आणि ६ खासदारांचे पुढच्या निवडणुकीतलं भवितव्य धोक्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला भसणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

 

COMMENTS