भाजपला धक्का, दोन मंत्र्यांसह आठ विद्यमान आमदारांचा राजीनामा!

भाजपला धक्का, दोन मंत्र्यांसह आठ विद्यमान आमदारांचा राजीनामा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला असून आठ आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अरुणाचल प्रदेशमधील भाजपातील ८ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून ११ एप्रिल रोजी या राज्यात मतदान होणार आहे.  भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान अरुणाचलमधील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष जारपूम गामलिन, गृहमंत्री कुमार वाय, पर्यटन मंत्री जारकर गामलिन या प्रमुख नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपाचे विद्यमान ८ आमदार आणि १२ पदाधिकारी असे एकूण २० जण एनपीपीत सामील झाले आहे. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नुकतीच ५४ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर भाजपाचे ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश व अन्य राज्यात एनपीपी आणि भाजपाची युती आहे.

COMMENTS