आणखी एका राज्यात भाजपची मित्रपक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडी जाहीर !

आणखी एका राज्यात भाजपची मित्रपक्षासोबत निवडणूकपूर्व आघाडी जाहीर !

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये मित्रपक्षांसोबत आघाडी केल्यानंतर आता आणखी एका राज्यात भाजपनं आज आघाडी जाहीर केली आहे. भाजपने पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलसोबत आघाडी जाहीर केली असून याठिकाणी भाजप संयुक्तपणे लोकसभेची निवडणूक लढविणार आहे.

गेल्या वेळेप्रमाणे यंदाही या ठिकाणी शिरोमणी अकाली दलाला जास्त जागा देण्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी होकार दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या आगामी निवडणुकीत शिरोमणी अकाली दल १० जागांवर तर भाजप ३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे आगामी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे पंजामध्ये या दोन्ही पक्षांची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे. २०१४ मध्येही या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली होती.

COMMENTS