भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणूक नाही, अमित शाह राहणार राष्ट्रीय अध्यक्ष !

भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणूक नाही, अमित शाह राहणार राष्ट्रीय अध्यक्ष !

नवी दिल्ली – भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणूक न घेण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच आगामी काळातही अमित शाह हेच राष्ट्रीय अध्य राहणार असून त्यांच्या नेतृत्वातच आगामी निवडणुका लढवल्या जाणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तसेच मागील निवडणुकीमध्ये भाजपला अमित शाहांच्या नेतृत्वात चांगलं यश आलं आहे. त्यामुळे पुढील काळातही याचं नेतृत्व अमित शाह यांच्याकडे राहणार असून ‘अजय भाजप’ असं या मिशनला नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान भाजमध्ये अंतर्गत निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अमित शाह यांच्या खांद्यावर कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत  अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे 2014 प्रमाणे शाह आणि मोदी या जोडगोळीची जादू पुन्हा चालणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

COMMENTS