भाजपला मोठा धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता देणार आघाडीला पाठिंबा ?

भाजपला मोठा धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता देणार आघाडीला पाठिंबा ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार इनकमिंग चालू असलेल्या भाजपलाच मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणे हे आगामी विधानसभा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातून लढवणार आहेत. तसेच ते बाहेरून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच याबाबत नारायण राणे लवकरच घोषणा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल नारायण राणे यांची भेट घेतली होती. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसेच आघाडीला पाठिंबा देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे नारायण राणे हे लवकरच भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ते बाहेरून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देणार असल्याचही बोललं जात आहे. त्यामुळे राणे यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS