अजित पवारांविरोधात लढण्यासाठी भाजपचे ‘हे’ पाच नेते इच्छूक!

अजित पवारांविरोधात लढण्यासाठी भाजपचे ‘हे’ पाच नेते इच्छूक!

पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजपचे पाच नेते इच्छूक असल्याचं दिसत आहे. आज सासवड येथे इच्छूक नेत्यांच्या मुलाखती पक्षाचे निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी घेतल्या. यावेळी कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु याठिकाणी प्रबळ इच्छुक असलेल्या बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, प्रशांत सातव व अविनाश मोटे यांनी मात्र मुलाखतीसाठी उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामती मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे याठिकाणी कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार हे अजूनही गुपीत आहे. परंतु आज घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये प्रबळ दावेदार उपस्थित नसल्यामुळे भाजपची ही रणनीती असल्याची चर्चा या मतदारसंघात सुरु आहे.

COMMENTS